डार्विनचा उत्क्रांतिवाद सिद्धांत बरोबर आहे काय?

लेखक: प्राचार्य अद्वयानंद गळतगे, भोज. जिल्हा- बेळगाव. भ्रमणध्वनीः ९९०२००२५८५.
... तरच डार्विनचा उत्क्रांतिवाद खरा मानता येईल
एकोणिसाव्या शतकात रॉबर्ट हुदिन व इतर अनेक त्या काळातील जादूगार मृतात्म्यांना बोलवल्या जाणाऱ्या ‘सीयन्स ‘नावाच्या खास बैठकीमध्ये हे मृतात्म्याकडून केले जाणारे (टेबल आपोआप अंतराळी उचलले जाणे इत्यादी) चमत्कार स्वतःच्या जादूने करून दाखवण्याबद्दल प्रसिद्ध होते. लंडनच्या मृतात्मवादी (Spiritualist) संघाचा ऑनररी सेक्रेटरी अल्गेनॉन जॉय याने त्यांना आव्हान दिले की की आमच्या अटीखाली मृतात्मे करीत असलेले प्रकार करून दाखवावेत व आमचे त्यासाठीचे एक सहस्त्र पौंडाचे खास बक्षीस जिंकावे. जॉयचे ते आव्हान अर्थात कोणत्याही जादूगाराने स्वीकारले नाही. स्वीकारणे शक्य नव्हते. कारण त्यांची जादू मृतात्मे करीत असलेली खरी जादू नव्हती. ती प्रेक्षकांची फसवणूक होती. तथापि त्यांचे म्हणणे असे होते की मृतात्म्याच्या नावाखाली केले जाणारे सर्व चमत्कार हीसुद्धा फसवणूक असते; आणि तेच आम्ही आमच्या 'युक्त्या' वापरून सिद्ध करून दाखवीत असतो. यावर ब्रह्म विज्ञानवादी मॅडम एच्. पी. ब्लॅव्हेट्स्की यांनी त्यांना असे आव्हान दिले : 'सीयन्स' च्या अंधाऱ्या खोलीत मृतात्म्यांचे चमत्कार बाजूला राहू द्या. भारतीय जादूगार दिवसा पूर्ण प्रकाशात जे जादूचे प्रयोग करतात ते त्याच परिस्थितीत करून दाखवावे. भारतीय जादूगार करीत असलेल्या अनेक जादूच्या प्रयोगापैकी तीन प्रयोग पाश्चिमात्य जादूगारांसाठी आव्हान म्हणून निवडले होते(हे ती
१. संशयवादी प्रेक्षकाने आपल्या मुठीत घट्ट धरलेल्या रुपाया विषारी नागसापात
रूपांतर करणे तो नाग विषारी असल्याची त्याच्या दातांची परीक्षा करून नंतर खात्री करणे.
२. प्रेक्षकांनीच निवडलेले कोणत्याही फळझाडाचे बी त्यानेच आणलेल्या फुलपात्रात पेरून त्यापासून रोपटे उगवणे, ते वाढवणे व त्याला फळे लागणे, ही गोष्ट पंधरा मिनिटात करून दाखवणे.
3 ज्यांच्या मुठी जमिनीत रोवलेल्या आहेत व टोके आकाशाकडे वर आहेत अशा तीन तलवारीवर माणूस पाठीवर झोपणे. प्रथम डोक्याखालील तलवार काढून घेणे, नंतर दुसरी तलवार काढून घेणे व शेवटी तिसरी तलवारही काढून घेणे व माणूस तसा हवेत झोपलेला राहणे. हे आव्हान हुदिन वा इतर कोणत्याही जादूगाराने स्वीकार करणे शक्य नव्हतेच. पण हे आव्हान आम्ही पाश्चिमात्य लोक ज्या त्यांच्या भौतिक ज्ञानाचा व त्याच्या अनुल्लंघनीय नियमांचा गर्व बाळगतात ते विज्ञान व त्याचे नियम कसे तकलादी ( मिथ्या) आहेत, हे ब्लॅव्हेट्स्कींना भारतीय जादूगारांच्या या प्रयोगांनी जगाला दाखवून द्यावयाचे होते. कारण हे आव्हान देऊन त्यांनी पुढे असे म्हटले आहे की मृतात्मा खोटा म्हणणारा हुदिनीच नव्हे, कोणत्याही पाश्चिमात्य जादूगाराने आपल्या 'युक्त्या' वापरून चमत्कार करून दाखवावेत. ते चमत्कार करून दाखवले तरच, ...होय, हक्सले म्हणतो त्याप्रमाणे मानवाची रानटी घोड्यापासून उत्क्रांती झाली आहे, (म्हणजेच डार्विनचा उत्क्रांतिवाद खरा आहे) हे आम्ही मान्य करू. (Isis unveiled, Vol I. Pp 73-74)लेखकाचा याच तीन चमत्कारांचा अनुभव